आमदार बच्चू कडू यांनी मोहोळ तालुका पदाधिकारीच केलं कौतुक

29

🔹तालुखाप्रमुख सह पदाधिकाऱ्यांनी घेतली बच्चू कडू यांची भेट

आज मोहोळ तालुक्यातील पदाधिकारी यांनी माझी मुंबई येथे भेट घेऊन तालुक्यातील अधिकाऱ्यांची तक्रार निवेदन माझ्याकडे आले आहेत त्यामुळे त्या सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की सर्व कामे लवकर मार्गी लावा अन्यथा पुढच्या महिन्यात मोहोळ तालुक्‍यातच्या दौर्‍यावर येणार आहे आल्यावर प्रहार स्टाईल दाखवल्याशिवाय राहणार नाही
प्रहार पक्षप्रमुख बच्चू कडू

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनीधी)

कुरुल(दि.24ऑगस्ट):-प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख बच्चुभाऊ कडू यांची मोहोळ तालुक्यातील पदाधिकारी यांनी भेट घेऊन मोहोळ तालुक्यातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये मोहोळ चे तहसीलदार भूमी अभिलेख अधिकारी मोहोळ चे गट विकास अधिकारी व बांधकाम विभाग हे सर्व अधिकारी सर्वसामान्य लोकांना अपमानास्पद वागणूक देतात सर्वसामान्य लोकांची कामे वेळेवर होत नाहीत अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यामुळे या अधिकाऱ्यांचे तक्रारी निवेदन आमदार बच्चू कडू व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना देण्यात आले मोहोळ चे तहसीलदार अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालतात मोहोळ तालुक्यात अनेकठिकाणी मुरूम उपसा झाला आहे त्याचे पत्र तहसीलदार यांना दिले होते तरीपण त्यांनी कारवाई केली नाही मोहोळ चे गट विकास अधिकारी यांना शासकीय योजनेचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये लावण्यात यावा याचे पत्र देण्यात आले होते ते पण काम त्यांनी केले नाही.

मोहोळ तालुक्यातील दिव्यांगा चा 5% निदी ग्रामपंचायत मार्फत वाटप झाला नाही भूमी अभिलेख मध्ये मोजणी ला अर्ज केला तरी एक एक वर्ष मोजणी होत नाही तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरावस्था झाली आलेली बांधकाम विभागाला कित्येक पत्र दिले आहेत तरीपण बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्ती केलेले नाहीत अशा सर्व तक्रारी निवेदन आमदार बच्चुभाऊ कडू व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे मोहोळ तालुका प्रमुख वैभव जावळे संपर्कप्रमुख नानासाहेब खांडेकर कार्याध्यक्ष अनिल पाटील करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर केशव सुतार महेश लवटे अधी शेतकरी उपस्थित होते