आमदार मा .डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल-हफ्ते खोरीचा आरोप भोवला

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1सप्टेंबर):-येथे श्री संत जनाबाई महाविद्यालयात दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी पोलिसांच्या हप्ता वसुलीमुळे तालुक्यात अवैध धंदे वाढले असा आरोप केल्याने शांतता समिती बैठकीत पोलिस अधिकारी व आमदार यांच्यात खडाजंगी झाल्याने शांताता बैठकीत अशांतता निर्माण झाली या प्रकरणी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश उत्सोव निमित्त संत जनाबाई महाविद्यालयात दुसऱ्यांदा झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत आ.डॉ.गुट्टे यांनी आपल्या भाषणात पोलिसांच्या हप्ताखोरी मुळे शहरात अवैध धंदे वाढले आहेत गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय सुनील माने आमदार यांचा फोनही घेत नसल्याचा आरोप केल्याने शांतता समितीची बैठक अशांततेत गुंडाळण्यात आली होती या प्रकरणाची दखल सर्वच माध्यमानी ठळकपणे घेतल्याने आमदारांचे वादग्रस्त वक्तव्य आमदारांना भोवले व अखेर दि 30 ऑगस्ट रोजी गंगाखेड पोलिसांनी आ.डॉ.गुट्टे यांच्यावर प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुनील माने यांच्या फिर्यादीवरून गु. र.नं.412/ 2022 कलम 500 भादवि कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 27 ऑगस्ट रोजी प्रशासनाने शांतता कमिटीची बैठक घेतली होती पण या बैठकीला आमदार उपस्थित नव्हते यामुळे त्यांनी प्रशासनास धारेवर धरले होते अखेर उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी पुन्हा दि. 29 ऑगस्ट रोजी आमदारांच्या उपस्थितीत ही बैठक बोलावली होती त्या बैठकीत शांतता व सामाजिक सलोखा राखण्याच्या उपाययोजनांवर भर देणे आवश्यक असताना आमदार यांनी सर्वांसमक्ष पोलिसांच्या हप्तावसुली बाबत पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते तर विभागीय पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा यांनी आमदारांच्या या आरोपाला आक्षेप घेतला व आमदारांना हप्ता घेतल्याचा थेट पुरावाच मागितला होता यादरम्यान आमदार व पोलीस अधिकारी आमने-सामने आले होते हा सर्व प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला होता त्यामुळे वातावरण तापले होते अशा वक्तव्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला असून जनसामान्यात पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असल्याच्या कारणाने आमदारावर गंगाखेड पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला या प्रकरणाचा तपास पीएसआय संदीप गडदे हे करीत आहेत.