दहिदूले जि प शाळेचे उपशिक्षक उगलाल शिंदे सरदार वल्लभ भाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

31

✒️पी.डी पाटील(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगाव(दि.7सप्टेंबर):-5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने सरदार वल्लभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल व युवा विकास फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “गौरव गुणीजनांचा” या कार्यक्रमाचे लेवा भवन जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात जि प प्राथमिक शाळा दहिदुले ता धरणगाव येथील उपशिक्षक श्री उगलाल नाना शिंदे यांना सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .या वेळी जळगाव जिल्ह्यातील 32 उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृतिशील शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिरीष चौधरी, शिक्षक आमदार सुधीर तांबे, जळगाव च्या महापौर जयश्री महाजन, माजी खासदार उल्हास पाटील, गुलाबराव वाघ, विष्णू भंगाळे,महेश पाटील,निलेश चौधरी, डॉ पी आर चौधरी, डॉ प्रशांत वारके, डॉ राजेंद्र वाघुळदे, डॉ स्नेहल फेगडे,डॉ आर आर अत्तरदे, विपुल पारेख, रवींद्र वाणी, व्ही झेड पाटील, अशोक मदाने, योगेश इंगळे, महेंद्र गांधी, संजय जैन, सुहास वाणी, हेमंत पाटील आदी उपस्थित होते . पुरस्कार प्राप्ती नंतर त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे