“त्या” मुख्याध्यापकाची बदलीचे नाही तर निलंबित चे आदेश काढा- गावकऱ्यांचे आक्रोश

29

🔸अखेर मांडवी गावातील मुख्याध्यापकची बदली,गावकरी असमाधानी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि. 23सप्टेंबर):- येथील मांडवी गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्यध्यापक यांची बदली करण्यात आली. दि. 13, 14,15 ऑगस्ट 2022 ला स्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात आला, परंतु दि. 14 व 15 ऑगस्ट 2022 ला प्रभारी मुख्याधापक सौ. रेखा दलाल ह्या शाळेत गैरहजर होत्या व या बाबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाला व समितीतील कोणत्याही सदस्यांना सूचना न देता सलग चार पाच दिवस सुट्या देवून मुलांना घरी बसवण्यात आले. गावातील सरपंच, उपसरपंच व प्रतिष्टीत नागरिक शाळेत गेले असता त्यांच्याशी उद्धट व अहम पणाची वागणूक दाखवत असभ्य पद्धतीने बोलुन प्रतिष्ठित गावकऱ्यांना अपमानित करण्यात आले.

शाळा व्यवस्थापन समितीला पोषण आहार पाहण्याचा कोणताच अधिकार नाही. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाळेमध्ये भेट घ्यायला गेले असता तुम्ही कोण आहात. अध्यक्ष असल्याचा ओळख पत्र दाखवा अशा शब्दात बोलून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षना अपमानित करत त्यांना असभ्य वागणूक देण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती ही माझ्या पार्टीची नाही विरुध्द पार्टीची आहे अशा प्रकारे राजकारणाचे धडे ऐकायला मिळाले. दि. 29 ऑगस्ट 2022 ला शाळा व्यवस्थापन समितीची मंजुरी न घेता स्व मर्जीने शाळेला सुट्टी दिली. अशा वागण्यामुळे शाळेच्या शिक्षणात शिकवणीकडे विपरीत परिणाम झाला. शिक्षणावर भर न देता पार्टी भेदावर भर दिल्याचे दिसून आले. त्यांच्याकडे असलेल्या वर्गाला शिकवण्यासाठी मुलगी ठेवली असून, त्या स्वतः दिवसभर खुर्चीवर बसून असतात. त्यामुळे विध्यार्थांचा शैक्षणिक नुकसान झाले असे गावकऱ्यांनी मत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान व्हायला नको, शालेय वातावरण खराब होऊ नये म्हणून त्वरित प्रभारी मुख्याध्यापक सौ. रेखा दलाल यांची बदली करण्यात यावी व योग्य कारवाई करण्यात यावी असे 23 ऑगस्ट 2022 ला निवेदन देण्यात आले. मा. गटशिक्षणाधिकारी प.स. भंडारा यांना याविषयीचे तक्रार पत्र दिले परंतु त्यावर काही कारवाई न दिसून आल्याने गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोको आंदोलन सुरू केले होते.कुलूप ठोको आंदोलनाने सर्व संबधित अधिकारी वर्ग यांनी मांडवी गावात भेट देवून गावकऱ्यांचे विचार जाणून घेतले व मुख्याध्यापक सौ. रेखा दलाल यांचे बदलीचे आदेश काढले. यातच न थांबता गावकऱ्यांकडून, मुख्याध्यापकांना निलंबित करण्याचे आदेश काढावे असे बोलले जात आहे. संबधित अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

यावेळी सरपंच सहसारामजी कांबळे, उपसरपंच प्रभाकर सार्वे, माझी पंचायत समिती सदस्य रामकृष्ण बेदरकर, शाळा समिती अध्यक्ष राजकुमार मोरे , माजी सरपंच हरिदास पडोळे , सतीश बेदरकर, शालू भुजाडे , लता मदनकर, सुरेखा अहिर , निर्मला लांबट, शोभाबाई मारबते, वन समिती अध्यक्ष विजय मदनकर , शाळा समिती उपाध्यक्ष विजय बेदरकर, तंटामुक्ती अध्यक्ष युवराज मेश्राम, यशवंत बेदरकर, नाशिक पडोळे, शिवशंकर बेदरकर ,अनिल रेहपाडे, निशा भुते, भगवान भाऊ कुथे, किशोर भाऊ निंबारते, सरपंच माठोरा रीना तुमसरे, सरपंच बेलगाव लक्ष्मणजी वाट, मनोज वळतकर, उपसरपंच बेलगाव अंबरकंठ नागलवाडी, विशाल सार्वे, आशिष भुते, दीपक रेहपाडे, दीपक बेदरकर, सोनू रेहपाडे ,सुरज ऊके, विजयजी रोटके, विकी बेदरकर, सुखदेव रेहपाडे, मोहन शेंडे ,अविनाश मेश्राम, कैलास धुर्वे ,जयशंकर घटाळे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री बाबुलाल भोयर व सरपंच जयश्री वंजारी, जयश्री सतदेवे, मंगला ठवकर, किशोर निंबाते, दिपाली कुरनजेकर, रिना तुमसरे, कमला कोथरमारे, सुनंदा मडावी, सौ. आर. राऊत , गंगाधर मार्बदे, भगवान चोपकर, श्रीराम रेहपाडे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.