निस्वार्थ मनाने केलेली सेवा वृद्धापकाळात समाधान देते – दादा महाराज नरळे

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔹पानवणमध्ये गुरुजनांची शोकसभा संपन्न

म्हसवड(दि.25सप्टेंबर):-आनंदा वाघमारे गुरुजी आणि दिनकर गोरवे गुरुजी यांनी आयुष्यभर प्रामाणिक आणि निस्वार्थी भावनेने गावाची शिक्षणसेवा केली. त्यांच्या या सेवा कार्यामुळेच दोघांनाही दीर्घ आणि समाधानाचे आयुष्य लाभले. निस्वार्थ मनाने आयुष्यभर सेवा केली तर वृद्धपकाळ समाधानात जातो, असे प्रतिपादन दादा महाराज नरळे यांनी केले.पानवण मध्ये अनेक वर्षे शिक्षणसेवा करणाऱ्या कै. आनंदा नागू वाघमारे आणि कै. दिनकर रखमाजी गोरवे या दोन गुरुजनांचे नुकतेच निधन झाले.संपूर्ण पंचक्रोशीत पानवण गाव शिक्षित आणि सुधारित गाव म्हणून ओळखले जाते. यापाठीमागे ज्या गुरुजनांचे कार्य मोलाचे ठरले, त्यामध्ये गोरवे गुरुजी आणि वाघमारे गुरुजी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

अशा या गुरुजनांना अभिवादन म्हणून पानवण ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक २५ सप्टेनंबर रोजी वाघमारे व गोरवे कुटुंबियांच्या उपस्थित शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दादा महाराज नरळे गुरुजी बोलत होते.यावेळी डॉ. सुधीर वाघमारे यांनी गुरुजींच्या स्मृतिनिमित्त दरवर्षी आरोग्य शिबीर घेणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, माजी शिक्षण समिती सदस्य राजाराम तोरणे, कास्ट्राइबचे तालुकाध्यक्ष संजय खरात, प्रा. गुलाब शिंदे, सरपंच सौ. जयश्री शिंदे, चेअरमन धनाजी शिंदे, माजी सरपंच दत्तात्रय शिंदे, डॉ. नानासाहेब शिंदे, भोजलिंग काळेल सर, शिवसेनेचे अंबादास शिंदे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अण्णासाहेब नरळे, शिवाजी शिंदे, कैलास तोरणे, दत्ता शिंदे, विठ्ठल शिंदे, नानासाहेब नरळे, विनोद शिंदे, युवा उद्योजक नानासाहेब शिंदे यांनी दोन्ही गुरुजींच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचालन राजाराम तोरणे यांनी केले.