वेदांत जसुतकर याची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड

55

✒️कारंजा घाडगे,प्रतिनिधी(पियूष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.27सप्टेंबर):- वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे शहरातील ए.आर.सी पब्लिक स्कूल येथे वर्ग १०वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी वेदांत जसूतकर याची जिल्हा स्तरीय विज्ञान मेळावा २०२२ वर्धा येथून विभाग स्तरावर निवड झालेली होती.रमण विज्ञान केंद्र,नागपूर येथे विभागीय मेळाव्याचे आयोजन दिं.२३/०९/२२ रोजी करण्यात आले होते.या मेळाव्यात महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले होते.त्यातून वेदांतने सादर केलेल्या शास्वत विकासासाठी मूलभूत विज्ञान आव्हाने आणि शक्यता या विषयाच्या सादरीकरण आणि त्या विषयाला अनुसरून तयार केलेल्या मॉडेल्स ने द्वितीय क्रमांक पटकाविला.

त्याची निवड राज्यस्तरावरील विज्ञान मेळाव्यासाठी करण्यात आली आहे.राज्यस्तरीय मेळाव्यात वेदांत वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल . वेदांत ने त्याच्या यशाचे श्रेय शाळेच्या संस्थापिका अरूनाताई चाफले तसेच त्याचे आई वडील व मित्र अर्णव पठाडे, पियूष विश्वास व प्रणय ठाकरे आदींना दिले आहे. वेदांतच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.शहरांतील राजकीय व सामाजिक संघटने तर्फे वेदांतला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.