ग्राम दर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी येथे विज्ञान मेळावा

35

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.1ऑक्टोबर):- ग्राम दर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी येथे विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक जाणीव जागृती व्हावी. विद्यार्थी जीवनातच त्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा. त्यांच्या मनात असलेली अंधश्रद्धा दूर व्हावी या दृष्टीने अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सदाशिव मेश्राम प्राचार्य, अध्यक्ष श्री दशरथ मारेकर वरीष्ठ लिपिक, प्रमुख अतिथी म्हणून कू. ए. आर. सातपुते मॅडम, श्री कारमेंगे सर, तसेच सर्व शिक्षक होते. मेळाव्यामध्ये ६१ विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर प्रयोगात्मक प्रतिकृती तयार करून सहभाग दर्शवला.

या प्रसंगी प्राचार्य सदाशिव मेश्राम, यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यानी अंधश्रध्देला बळी न पडता विद्यार्थी जीवनापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा अशाप्रकारे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी श्री दशरथ मारेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता श्री रासेकर सर, कारमेंगे सर व कू. राऊत मॅडम या विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अतिशय सुंदर व काल्पनिक प्रतीकृती तयार करवून घेतले. त्याबद्दल त्यांचे व विद्यार्थ्यांचे प्राचार्यांनी अभिनंदन केले. कार्क्रमाचे संचालन श्री रासेकर सर, प्रास्ताविक श्री कारमेंगे सर व आभार प्रदर्शन कू. राऊत मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्व शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.