१७ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन

27

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.8ऑक्टोबर):-नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे ३९ वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही “१७ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०२२”चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला दरवर्षी संपूर्ण महाराष्टातून उत्तम प्रतिसाद मिळत असतो. या वर्षी २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकाच्या दोन प्रती संपादकांनी पाठविण्याचे संस्थेच्या वतीने आवाहान करण्यात आले आहे. ही स्पर्धा विनामूल्य आहे. यात सहभागी होणा-या प्रत्येक दिवाळी अंकास समारंभपूर्वक सन्मानपञ, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सन्मानानित करण्यात येते. तसेच प्रथम तीन क्रमांकाना सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, गौरवपञ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात येते.

संपादकांनी आपला दिवाळी अंक २०२२ चा प्रकाशित झाल्यावर पुढील पत्यावर लवकरात लवकर पाठवावा. दिवाळी अंक पाठविण्याचा पत्ता- प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे, राष्टीय अध्यक्ष- नक्षञाचं देणं काव्यमंच,साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाईटस, पीसीएमटी चौक, भोसरी, पुणे -४११०३९ वर पाठवावे.

नक्षञाचं देणं काव्यमंच ही संस्था गेली २३ वर्ष काव्य व साहित्य क्षेञात भरीव असे कार्य करत आहे. दिवाळी अंकाच्या माध्यमातुन मायमराठीची सेवा केली जाते. दर्जेदार साहित्य वाचकांना वाचण्यास मिळत असते. त्यातुन उत्तम साहित्य, काव्य लिहीणारे घडत असतात. मराठीच्या दालनात दिवाळी अंकाचे एक वेळेच स्थान आहे.

सर्व दिवाळी अंक संपादकांनी आपल्या दिवाळी अंकाच्या प्रती पाठवून सहभाग घ्यावा. असे आवाहान नक्षञाचं देणं काव्यमंचवतीने करण्यात आले आहे.