कु.आचल उमाळे हिची गगन भरारी

112

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.22ऑक्टोबर):- अकोला येथील श्री.अनिल उमाळे यांची कन्या कु.आचल अनिल उमाळे हिचे गो फर्स्ट एअरलाईन मध्ये मध्ये निवड झाल्याने तिच्या ह्या उत्तुंग भरारीमुळे तिच्यावर अकोला-अमरावती जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कु.आचल शिक्षणात खुप हुशार व होतकरू असल्यामुळे तिच्या अंगी लहानपणापासुनच जिद्द व चिकाटी असून तिचे वडील शेतकरी कुटुंबातील असून शेती करतात.

आपल्या लेकीने शिकून स्वत:च्या पायावर उभं राहावं अशी आई-वडिलांची इच्छा असल्यानं त्यांनी मोठ्या कष्टानं आपल्या मुलींवर शिक्षणाचा पगडा ठेवत तिला शिकवलं व आई महानगरपालिका प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.ह्यामुळे मी जे यश प्राप्त केले त्याच संपूर्ण श्रेय कु.आचल हिने आपल्या आई-वडिलांना दिल.

कु.आचल हिचे मुळ गाव अमरावती जिल्ह्यातील हरम ता.अचलपूर असून आईच्या नोकरीमुळे अकोला येथे राहतात.त्यामुळे अकोला-अमरावती जिल्ह्यासाठी ही भूषणावह बाब आहे.कु.आचल उमाळे हीचे एअरलाईन्स मध्ये निवड होण्यापूर्वी ती मुंबई येथील नामांकित कॉल सेंटर मध्ये कार्यरत होती.तिचे आता गो फर्स्ट एअरलाईन्स मध्ये निवड झाल्यामुळे ग्रामस्थ,आप्तेष्ट,नातेवाईक, परिसरातील नागरिकचं नाही तर शहरी भागातील नागरिक,शिक्षक,शिक्षिका ह्यांनी तिचा अभिनंदन सत्कार सोहळा घेतला.