महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस परिवहन विभागाच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदावर रुपेश टीकले नियुक्त

12

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.1नोव्हेंबर):- महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी अंतर्गत परिवहन विभागाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष म्हणून रूपेश टीकले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

सदर नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली परिवहन विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. अमित मेश्राम यांनी केली. रुपेश टिकले यांच्यावर परिवहन विभागाची जबाबदारी देत असताना आहे. त्यांचे संघटन विकासमुळे कांग्रेसला जनाधार प्राप्त होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी रुपेश टिकले यांना नियुक्ती पत्र देतांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक व अन्य मान्यवर. रुपेश टिकले यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, डॉ. नामदेवराव उसेंडी, सतिश विधाते, रजनीकांत मोटघरे, विश्वजित कोवासे, आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिले आहे.