राष्ट्रीय एकात्मता काळजी गरज आहे…. डॉ बन्सोड

29

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.1नोव्हेंबर):- स्थानिक राष्ट्रसंत तुकोडोजी महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य लेफ्टनंट डॉ प्रफुल्ल बन्सोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि देशाची राष्ट्रीय एकात्मता ,व अंतर्गत सुरक्षितता ही युवकांच्या हातात आहे. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून कार्य केले पाहिजे. सरदार वल्लभभाई पटेल यांची देशाप्रती असणारी निष्ठा अंगीकृत करण्याचा संकल्प केला पाहिजे. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.गुजरात मधील मोरबी अपघातातील लोकांना श्रध्दांजली अर्पण केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो विभागीय समन्वयक प्राध्यापक पी वी पिसे यांनी केले त्यानी राष्ट्रीय एकता दिवसाचा उद्देश समपर्क शब्दात सांगितला तसेच भारताचे प्रथम गृहमंत्री व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला प्रा. डॉ हरेश गजभिये, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राकेश कुमरे, प्रा. आशुतोष पोपटे, प्रा. रोशन कुमरे, प्रा. दडमल उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रफुल राजुरवाडे यांनी केले.आभार प्रा.अमर ठवरे यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.