शिक्षकांच्या समस्या लवकरच सोडवणार – दत्तात्रय सावंत

38

🔹पहिले दोन दिवसीय अधिवेशन संपन्न

✒️पंढरपूर प्रतिनिधी(अमोल कुलकर्णी)

पंढरपूर(दि.3नोव्हेंबर):-“जुनी पेन्शन योजना ते सरसकट सर्व शाळांना शंभर टक्के अनुदान अशा अनेक प्रकारच्या शिक्षण क्षेत्रातील समस्या लवकरच सोडवून शिक्षण क्षेत्राला नवी उभारी देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याची ग्वाही पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली”. भांबर्डे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे दोन दिवशीय निवासी अधिवेशनामध्ये ते समारोपाच्या भाषणावेळी बोलत होते या अधिवेशनाच्या अंतिम ठरावामधील जवळपास 19 मुद्दे घेऊन शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आश्वासन त्यांनी जमलेल्या शेकडो शिक्षकांना दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे, कोकण विभागाचे आमदार बाळा पाटील व्याख्याते श्रीमंत कोकाटे आदींसह विविध जिल्ह्यातून आलेले जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अमरावती विभागाचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सावंत सरांची संघटना त्यांचे कार्य आणि भविष्यातील वाटचाल यावर अगदी खुमासदार शैलीमध्ये मनोगत व्यक्त केले.एका दिवशी चार सत्र तर दुसऱ्या दिवशी तीन सत्रे अशा सात भागात झालेल्या या अधिवेशनामध्ये सोलापूर सांगली,सातारा,पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातून पाचशेहून अधिक शिक्षक बांधव उपस्थित होते. संपर्क या संस्थेची असणारी निवासी शाळा हे अतिशय दुर्गम असणारे ठिकाण प्राचार्य दत्तात्रय चाळक सरांनी या अधिवेशनासाठी उपलब्ध करून दिले.

पहिल्या दिवशी संघटन ही काळाची गरज या विषयावर राजेंद्र कोंढरे,शशांक मोहिते,तुकाराम मस्के यांचे मार्गदर्शन झाले संध्याकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये कवी इंद्रजित घुले यांच्या उपस्थितीत काव्य संमेलन झाले त्यामध्ये ग्रामीण स्तरातील रमजान मुल्ला,शिवाजी बंडगर,आबा पाटील सूर्याजी भोसले,राजेश पवार,शिवाजी सातपुते सर्व कवींनी कार्यक्रमाला रंगत आणली दुसऱ्या दिवशीचे सत्र हे जवळच असणाऱ्या घनगड या किल्ल्याची चढाई करून सुरुवात झाली तर अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रामध्ये आमदार बाळाराम पाटील यांनी राजकारणाची बदलती दिशा त्यासाठी संघटनेचे महत्त्व विशद करून शिक्षकांना प्रवृत्त केले. अध्यक्षीय भाषणामध्ये नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सावंत सरांचे संघटन,कार्य, मोर्चे,आंदोलने हे अतिशय सामान्य स्तरातून सुरू असून त्यांच्या स्वभावातील साधेपणाचे महत्त्व सांगितले.

कोणत्याही प्रकारची रेंज मोबाईलला नसल्याने खऱ्या अर्थाने अधिवेशनाशी एकरूप झालेल्या शिक्षकांना एक नवी ऊर्जा मिळाल्याचे दिसून आले.भविष्यामध्ये पाच हजार शिक्षकांचे संघटन लवकरच घेणार असल्याचे जाहीर करून अधिवेशनाची सांगता झाली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र आसबे यांनी केले तर अधिवेशन पार पडेपर्यंत राज्य संघटक समाधान घाडगे,मारुती गायकवाड, अमोल कुलकर्णी पुणे विभागाचे कल्याण बर्डे, प्रसाद गायकवाड,अनंत गरजे, साताऱ्याचे विजय येवले,सचिन नलावडे,सुनील धनवडे, तरडे सर ,नितीन कोंडे सोलापूर जिल्ह्याचे गुरुनाथ वांगीकर व सहकारी, सुरेश गुंड सर बार्शी, मुकुंद मोहिते सर बार्शी,प्रमोद देशमुख सर बार्शी, शंकर वडणे सर,जिल्हा संपर्क प्रमुख सोलापूर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.