सत्यशोधक पुस्तक चळवळीने बालदिनी मुलांना दिले वैचारिक खाद्य !

13

🔸पुस्तक स्टॉल ने वेधले सर्वांचे लक्ष !.. – प्रिंसीपल चैताली रावतोळे

🔹पुस्तक वाचल्याने विद्यार्थ्यांना दिशा मिळते – मा. वैशाली पवार

✒️धरणगांव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगांव(दि.15नोव्हेंबर):- २०२२ रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गुड शेफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल व गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, धरणगांव येथे बालदिनानिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या दोघेही शाळेमध्ये बालगोपालांनी विविध स्टॉल लावले होते. पण आकर्षण ठरले ते सत्यशोधक पुस्तक चळवळीचे बुक स्टॉलचे !…. सर्व बालगोपालांनी खाण्यापिण्याचा आनंद घेतला. पोटाची भूक भागल्यानंतर मनाची- बुद्धीची भूक भागविण्यासाठी सर्वांनी पुस्तक स्टॉलला भेट दिली व विविध महाराष्ट्रातील संत महापुरुषांचे जीवन ग्रंथ घेतले. जीएसए स्कूलच्या प्राचार्य चैताली रावतोळे यांनी बुक स्टॉलची प्रशंसा केली. याप्रसंगी सत्यशोधक पुस्तक चळवळीचे संस्थापक पी.डी.पाटील व यांनी शाळेचे इन्चार्ज जगन गावीत यांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व ज्योती लक्ष्मणराव पाटील यांनी विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले यांचे ग्रंथ चैताली रावतोळे मॅम यांना भेट दिले.

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या आनंद मेळाव्यात देखील आकर्षण ठरले ते पुस्तक स्टॉल. सर्व बालकांनी व सोबत आलेल्या पालकांनी पुस्तकांची खरेदी केली. गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापक वैशाली पवार यांनी तर सर्व ग्रंथ शाळेसाठी घेतले व पुस्तक स्टॉलचे कौतुक देखील केले. ज्योती लक्ष्मणराव पाटील यांनी ” छत्रपती शिवरायांचा स्त्रीविषय दृष्टिकोन ” हा ग्रंथ वैशाली पवार यांना भेट दिला.आनंद मेळाव्यामध्ये हर्षल प्रमोद पाटील, संकेत प्रमोद पाटील, विवेक लक्ष्मण पाटील, निधी लक्ष्मण पाटील यांनी पुस्तक स्टॉल लावून सत्यशोधक पुस्तक चळवळीने एक बाल दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबविला व याला उदंड प्रतिसाद मिळाला.