ग्राम पंचायत मोहा (ई) रामनगर येथे झालेल्या आमदार निधीतील सिमेंट कॉक्रीट रस्त्याची तात्काळ चौकशी करण्याची रोहन राठोडची मागणी

34

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.19नोव्हेंबर):- पासुन सात की.मी.असलेल्या मौजे मोहा इजारा रामनगर येथे ग्रामपंचायत अंतर्गत आमदार निधीतुन झालेल्या सिमेटं कॉक्रीट स्त्याचे कामकाज अतीशय निकृष्ठ दर्जेचे झाले असुन त्या रस्त्याचे कामकाज शासणाच्या निकषानुसार व इंस्टीमेंट नुसार कामकाज न करता केवळ ताथुर- माथुर काम करण्यात आले असुन त्या झालेल्या कामकाजाची जेंई – सचिव व ठेकेदार यांनी हातमीळवणी करूण केवळ निकृष्ट दर्जेचे काम करण्यात आले आहे.

सदर कामाबदल अनेकवेळा गांवकऱ्यानी वारंवार समजाऊन सांगीतल्या नंतर ही तुमच्याचाने काय होते ते करून घ्या माझा कोणीच मालक नाहीं असे उदंड पणाची भाषा केल्या जाते त्या उंदड पणामुळे गावचा विकास तर दुर पंरतु भ्रष्टाचार मात्र जास्तच या जांचाला कटाळुन तक्रारकर्ता रोहन नामदेव राठोड यानी दि,07/10/2022 रोजी गटविकास अधीकारी प,स,पुसद यांना लेखी तक्रार देऊन देखील कोणत्याही प्रकांरची चौकशी होत नाही कारण ठेकेदार यांची मनमानी सुरू असुन शासणानी दिलेल्या निकषानुसार कामकाज व्हावयास पाहीजे तसे न करता सचिव,जेई,ठेकेदार यांची संगणमत करून अतीशय निकृष्ट दर्जाचेच काम केल्या जात आहे.

तक्रारकर्ता यानी दिलेल्या तक्रारीची तात्काळ चौकशी न झाल्यास व प्रत्यक्ष पाहणी करून कार्यवाही न झाल्यास पुढील मार्ग लोकशाही मार्गाने सामोर जावे लागेल.सदरील सिमेंट कॉक्रीटच्या रोडची गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करून झालेल्या निकृष्ट दर्जेच्या सिमेंट कॉक्रीट रस्त्याची सखोल चौकशी करावी आणी त्वरीत कार्यवाही करण्यात यावी अन्यथा तक्रारकर्ता रोहन राठोड यांनी उपोषणास बसण्याचा इशारा देखील दिला आहे.सदर प्रकारची चौकशी आठदिवसाच्या आत न झाल्यास लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालया समोर 02/11/22 पासुन उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे,