प्रा.प्रतिभा बोंबले यांना प्राणीशास्त्रातील पीएच.डी पदवी प्रदान

38

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)

राजगुरुनगर(दि.२९नोव्हेंबर):- वेताळे गावच्या रहिवाशी शोभा बोंबले यांच्या कन्या इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, पुणे येथील सहायक प्राध्यापक प्रतिभा बोंबले यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पी एच.डी.पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी प्राणीशास्त्र या विषयामध्ये Cellular, biochemical and molecular studies on multiple stresses: combinatorial response on desiccation, starvation and heat stress in Chironomus and Drosophila या विषावर संशोधन केले आहे.

प्रा. प्रतिभा निवृत्ती बोंबले यांनी डिसेंबर 2014 ला CSIR-JRF, AIR -40 आणि जून 2015 ला UGC-NET-LS, AIR-42, पास करून PhD साठी प्रवेश मिळविला होता. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागामध्ये त्यांनी संशोधनाचे काम केले, प्राणीशास्त्र विभागाचे माझी विभागप्रमुख आणि सध्या डोहा कतार येथे MIE-SPPU या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा नाथ यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे.

त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या आईचे खूप मोठे योगदान आहे शेतमजुरी करून त्यांनी एकटीने मुलांना शिक्षण देऊन मोठे केले. सर्व कुटुंबियांच्या आणि वेताळे गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने डॉ. प्रतिभा बोंबले यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असुन वेताळे गावातून पीएच.डी करून डॉक्टरेट मिळवणाऱ्या त्या प्रथम आणि एकमेव सदस्य आहेत.

ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टरमधून युवकाने घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार