अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा पूर्णवेळ वीज उपलब्ध करून द्या — आमदार देवेंद्र भुयार

33

🔹आमदार देवेंद्र भुयार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.6डिसेंबर):-भारनियमनाच्या काळात रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने अनेक शेतकरी बांधवांना आपला जीव धोक्यात घालून पिकास पाणी द्यावे लागत आहे. प्रसंगी सर्पदंश किंवा बिबट्याच्या सारख्या हिंस्त्र श्वापदाच्या हल्ल्यात शेतकऱ्यांना जखमी व्हावे लागते असून शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून शेतीला पाणी द्यावे लागत आहे. एकीकडे महाराष्ट्र शासनाकडून शेतक-यांना दिवसा १२ तास सतत विज पुरवठा करण्याचे घोषीत करण्यात आले होते. परंतू त्यामधुन अमरावती जिल्हा वगळण्यात आल्यामुळे शासणाप्रती शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होताना दिसत आहे.

त्यामुळे शासनाने शेतकरी बांधवांच्या संयमाचा अंत न पाहता मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करावा. अशी आग्रही मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्यात यावर्षी दमदार पावसाने हजेरी लावल्याने विहिरींची भूजल वाढण्याबरोबरच धरणेही काठोकाठ भरल्याने शेतकऱ्यांत उत्साह संचारला आहे. शेतकऱ्यांची रब्बी पिकांची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. आता संत्रा, मोसंबी फळपिके गहू, हरभरा, मका, ज्वारी आदी रब्बी पिके तर भाजीपाला व तत्सम पिकांची उभारणी अंतिम टप्प्यात आली असल्याने या उभारलेल्या पिकांना पाणी देण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र त्याच वेळेस राज्य महावितरण कंपनीने आपली सालाबाद प्रमाणे दाखवली जाणारी कला दाखविण्यास प्रारंभ केला आहे.दिवसा कायमच वीज गायब असते तर रात्री वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यास महावितरण कंपनीने प्रारंभ केला आहे.

सध्या रात्रीच्या वेळी थंडीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच बिबटे, वाघ व रानडुकरे या रानटी प्राण्यांचा संचार वाढल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकास पाणी देण्यासाठी जाणे हि खूपच जोखमीची बाब ठरत आहे.या बाबत महावितरण कंपनीस शेतकरी बांधवांनी कल्पना देऊनही शेतकऱ्यांचा कैवार कोणीही घेताना दिसत नाही हि दुर्भाग्याची गोष्ट असून महावितरण कंपनीने दिवस भारनियमन करून वीज पुरवठा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी रेटून धरली.

मोर्शी विधानसभा मतदार संघात शेतक-यांचे मुख्य पिक संत्रा फळ पिक आहे. त्यामुळे फळ पिकाचे सिंचनासाठी सतत विज पुरवठा असणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाकडून शेतक-यांना दिवसा १२ तास सतत विज पुरवठा करण्याचे घोषीत करण्यात आले होते. परंतू त्यामधुन अमरावती जिल्हा वगळण्यात आलेला असून अमरावती जिल्ह्यातील शेतक-यांचा विचार करता शासनाकडून पुर्नविचार करून अमरावती जिल्हा तसेच मोर्शी विधानसभा मतदार संघाकरीता दिवसा १२ तास सतत विज पुरवठा करण्याचे निर्देश देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. – देवेंद्र भुयार आमदार मोर्शी विधानसभा