बसपा शिर्डी लोकसभेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

34

✒️श्रीरामपुर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

श्रीरामपूर(दि.6डिसेंबर):-बहुजन समाज पार्टी शिर्डी लोकसभेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिर्डी लोकसभेचे प्रभारी प्रकाश आहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्ली येथे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. त्यामुळे ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौध्द पध्दतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. नंतर काही वर्षांनी डॉ. आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाअगोदर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरु होते. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात दलित आणि बौद्ध धर्मीयांसाठी आपलं जीवन वेचणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी मोठा जनसागर उसळतो. असे त्यांनी सांगितले.

अभिवादन प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे श्रीरामपूर विधानसभा सचिव ताराचंद त्रिभुवन, श्रीरामपूर विधानसभा सदस्य विशाल टेकाळे, विधानसभा उपाध्यक्षा कल्पनाताई त्रिभुवन, नामदेव शिंदे, श्रीरामपूर शहर संघटक संजय सूर्यवंशी, श्रीरामपूर शहर कोषाध्यक्षा मीनाताई सोनवणे, सदस्य विजय मटाले, शिरसगाव शाखाध्यक्ष मन्सूर शेख, भारत शिंगे, बेलापूर शाखाध्यक्ष बापू भगत, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.