उमरखेड तहसीलदाराने संविधान दिन का ? साजरा केला नाही -भिम टायगर सेना

93

🔹तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.10 डिसेंबर) तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी तहसील कार्यालय उमरखेड येथे भारतीय संविधान दिन साजरा का? केला नाही.असा प्रश्न भीम टायगर सेना (सामाजिक संघटना) उमरखेड यांचे पदाधिकारी श्याम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ), सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष उमरखेड) आणि कैलाश कदम (तालुका अध्यक्ष उमरखेड) यांनी उपस्थित केला आहे.

तसेच यवतमाळ जिल्हा अधिकारी यांनी शासनाच्या 26 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय संविधान दीन घेण्या ऐवजी 25 नोव्हेंबर 2022 रोजी ला घेण्याचा व तसा आदेश काढून भारतीय संविधान दिनाचे महत्त्व, त्या संविधानची जनजागृती होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय संविधान दिन 25 नोव्हेंबर रोजी साजरा करण्याचा आदेश दिला.

या आदेशाचा भीम टायगर सेना सामाजिक संघटना उमरखेड ने विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांच्याकडे निवेदनामार्फत संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाई ची मागणी केली आहे.

तसेच माहितीस्तव उपविभागीय अधिकारी उमरखेड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

हा भारतीय संविधानाचा अपमान आहे. यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. याकरिता भीम टायगर सेना उमरखेड च्या तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

https://www.purogamiekta.in/2022/12/10/56803/