सत्यशोधक समाज संघाच्या जिल्हा अधिवेशनात शहरातून २०० कार्यकर्ते सहभागी होणार!….

29

▪️ स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे यांची माहिती

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.10डिसेंबर):- सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव व सत्यशोधक राजर्षी शाहू महाराजांच्या स्मुर्ती शताब्दी वर्षानिमित्त पानाचे कुऱ्हे ता.भुसावळ येथे आयोजित सत्यशोधक समाज संघाच्या दुसऱ्या जिल्हा अधिवेशनात जळगाव शहरातून २०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.आज पद्मालय शासकीय विश्रामगृहात अधिवेशनाच्या नियोजनासाठी स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

अर्वाचीन भारताच्या इतिहासात ज्या सामाजिक,संस्कृतिक, स्वावलंबी चळवळीमुळे भारतातील तमाम महिला,शूद्र – अतिशूद्र हक्क व अधिकार मिळाले ती चळवळ सत्यशोधक विचारातून धारदार झाली आहे. असे मत व्यक्त करून मुकुंद सपकाळे यांनी पानाचे कुऱ्हे ता.भुसावळ येथे उद्या दिनांक ११ डिसेंबर २०२२रोजी होणाऱ्या सत्यशोधक समाज संघाच्या दुसऱ्या जिल्हास्तरीय अधिवेशनाची माहिती दिली.

यावेळी जळगाव शहरातून २०० कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.डॉ.सुरेश झाल्टे यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या अधिवेशनाचे उद्घाटन आ.शिरिषदादा चौधरी यांच्या हस्ते होणार असून मराठा विद्या प्रसारक समाज सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे,पहिल्या ओबोसी महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा विजया ताई मरोतकार,किरण इंगोले (उद्योजक,पुणे) हे प्रमुख अतिथी असणार आहेत.दोन सत्रात होणाऱ्या अधिवेशनात जी.ए.उगले(सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक,पैठण),डॉ.प्रल्हाद लुलेकर (फुले – आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, औरंगाबाद),विश्वासराव पाटील(प्रचारक – सत्यशोधक समाज संघ,अमळनेर) यांची भाषणे होणार आहे.

आज पद्मालय शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत भारत ससाणे,हरिश्चंद्र सोनवणे, चंद्रकांत नन्नवरे,रमेश सोनवणे,चंदन बिऱ्हाडे, दिलीप सपकाळे, वाल्मीक सपकाळे, डॉ.मिलिंद बागुल, प्रा.डॉ. सत्यजित साळवे, बापूराव पानपाटील,अमोल कोल्हे, विजयकुमार मौर्य,समाधान सोनवणे,भारत सोनवणे,नितीन मोरे,राजू मोरे,मिलिंद सोनवणे, आनंदा तायडे,जगदीश सपकाळे, संतोष गायकवाड,महेंद्र केदारे,प्रा. प्रीतीलाल पवार,गौतम सपकाळे,सुरेश सपकाळे, भिमराव सोनवणे, प्रकाश बारी,नीलेश बोरा,दत्तू सोनवणे,भैय्या सपकाळे, भगवान बाविस्कर, जयपाल धुरंदर, सुभाष साळुंखे,आशुतोष तायडे,आकाश सपकाळे,आदी उपस्थित होते.

https://www.purogamiekta.in/2022/12/10/56803/