निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 66 व्या पुण्यतिथीनिमित्त तलवाडा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न

31

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.20डिसेंबर):-प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी निष्काम कर्मयोगी राष्टसंत गाडगेबाबा यांच्या 66 व्या पुण्यतिथी (स्मृर्तीदीना) निमित्ताने संत गाडगेबाबा यांच्या आणुयाई व गावक-यांच्या वतिने मगंळवार दी, 20.12.2022. सकाळी 11,00 वाजता संतगाडगेबाबा चौक गणेश नगर येथे माजी जि. प. सदस्य युवराज तात्या डोंगरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. प्रतिमा पुजनाच्या कार्यक्रमानंतर समाज बांधव व गावक-यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत अभिवादन केले. तसेच दुपारी 2,00 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सर्व समाज बांधवांसह गावक-यांनी महाप्रसादाचा लाभ घेत संध्याकाळी किर्तनाच्या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमास तलवाडा गटाचे मा. जि. प. सदस्य युवराज तात्या डोंगरे, जेष्ट नागरिक बबनराव भांबरे, दैं दिव्य लोकप्रभाचे पत्रकार सचीन डोंगरे सर, बंटी भांबरे, नवनाथ भाबरे, भिमा भांबरे, शेख आतिखभाई, वैभव भांबरे, मस्के बाबा, जालिंदर राऊत, चेतन देवकर, कृष्णा भांबरे, तुळशीदास महाराज राऊत, सह गावकरी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.