कोमलवाडीत दोन मेंबरला सारखी मते; शेवटी चिठ्ठी काढली

28

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.20डिसेंबर):- तालुक्यातील भोजगाव – कोमलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदासाठी झालेल्या मतदानात दोन उमेदवारांना सारखीच मते मिळाली.

त्यामुळे निवडणूक प्रशासनाने नितीन म्हेत्रे नावाच्या मुलाच्या हाताने चिठ्ठी काढली. त्यामुळे सुर्यकांत जयवंतराव धनवडे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने धनवडे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे