पुसद न्यायालयात कार्यर्रत असलेल्या अटर्णी यांची कार्यकारणी जाहीर

🔸अटर्णी संघटनेच्या अध्यक्षपदी सखाराम इंगळे तर सचिव म्हणून यशवंत भालेराव यांची अविरोध निवड

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.4फेब्रुवारी):-न्यायालया मधील कार्यरत असलेले अधिकृत अटर्णी याची आज बैठक घेऊन कार्यकारनीत व संघटनेच्याअध्यक्षपदी सखाराम इंगळे तर सचिव म्हणून यशवंत भालेराव यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. न्यायालयातील काम करीत असताना वकील व पक्षकारांचा दुवा साधून कार्य करणारे म्हणजे अटर्णी आहेत. अटर्णीचे कार्य प्रामाणिकपणे करीत असताना अटर्णी यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दमदाटीचा प्रकार, अन्याय अत्याचाराच्या घटना त्याचा बिमोड करण्यासाठी व आर्थिक संकटासह इतरही सुखदुःखाच्या घटनेमध्ये साथ देण्याच्या दृष्टीने अटर्णी संघाची स्थापना करण्यात आली आहे.

या संघटनेची निवडणूक दरवर्षी घेतल्या जात असते. आणी याही वर्षीच्या २०२३ च्या अटर्णी संघाच्या अध्यक्षपदी व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी ०२ फेब्रुवारी 2023 ही तारीख जाहीर करण्यात आली होती. परंतु यावेळी एकमताने संघाच्या सर्व सदस्यांनी अध्यक्ष म्हणून प्रमाणीक व सरळ साधा स्वभावाचा प्रेमळ मनाचा व्यक्ती म्हणजे श्री.सखाराम हनवतराव इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. व तसेच कार्यकारणी मध्ये सचिव म्हणून यशवंतराव उद्धवजी भालेराव यांची निववड करण्यात आली,तर कोषाध्यक्ष म्हणून सुभाष रामदास चव्हाण यांची अविरोध निवड करण्यात आली.

कार्यकारणी सदस्य मध्ये परमेश्वर गुद्दटवार, रामदास नरवाडे, रामराव आमले, शंकर खंदारे, मिलिंद धुळे, संतोष खिराडे, उत्तम जैन, रमेश राठोड, संजय तोंडारे, बालाजी पवार, प्रमोद चव्हाण, दुर्गादास राठोड, शामराव गावस, मुरलीधर जाधव, प्रमोद चव्हाण, शेख निसार, आमच्या भाई, बंटी चव्हाण, संतोष जाधव, गजानन खडीकर, पुंजाराम मस्के, अमोल खंदारे इत्यादीचा समावेश आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED