जनहिताचे निर्णय घेणा-या तेलंगणा मुख्यमंत्र्याचा तलवाड्यात वाढदिवस साजरा

29

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.20फेब्रुवारी):-तालुक्यातील तलवाडा येथे शेतकरी व सर्व सामान्य जनाच्या हिताचे निर्णय घेणा-या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्यातील गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील त्याचे चाहते खिजरभाई सौदागर, वचीष्ट बेडके, रमेश नाटकर, जयदेव शिगणे, व शेतकरी बांधवांनी जनहित नायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.

या बाबत माहिती अशी की तलवाडा येथील शेती निष्ठ शेतकरी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या महाराष्ट्रातील नांदेड येथील शेतकरी मेळाव्याच्या सभेसाठी गेले होते. त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी तेलंगणा राज्यात शेतक-यांच्या व सामन्य जनांच्या हिताच्या राबवत असलेल्या योजना बाबत वस्तुतीनिष्ट माहिती दिली होती. त्यामुळे हे महाराष्ट्रात पण शक्य होऊ शकते.

या अपेक्षा मनी बाळगून गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील शेतकरी खिजरभाई सौदागर व त्यांच्या सर्व शेतकरी सहकाऱ्यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा झेंडा हाती घेत शेतकरी व सर्व सामान्यांच्या प्रश्नासाठी काम करण्याचा निश्चय करून गेवराई तालुक्यात कार्याला सुरुवात केली असून जनहित नायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा वाढदिवस मोठया ऊत्सहात माईंड क्लासेस या ठिकाणी विध्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शालैय साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला.

या वेळी तलवाडा येथील जेष्ठ बाबुराव(दादा) कुलकर्णी, समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापू आण्णा गाडेकर, बाबुराव नाटकर, शिवसेना सर्कल प्रमुख शेख रफिकभाई, संत रविदास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार तुळशीराम वाघमारे, पत्रकार सुभाष शिंदे, शेख आतिखभाई, अशोक सुरासे, नाथा कावळे सर, महिला शिक्षिका व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.