वाठोडा येथे ग्रामीण भागातल्या समस्या सोडवण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ !

30

🔹आमदार देवेंद्र भुयार यांनी सर्व विभागाचे अधिकारी गावात नेऊन सोडवल्या नागरिकांच्या समस्या !

🔸आमदार आपल्या दारी उपक्रमातून हजारो तक्रारींचा निपटारा !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वरुड(दि.24फेब्रुवारी):-आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून आमदार आपल्या दारी उपक्रम वरुड तालुक्यातील विविध गावांत राबविण्यात येत आहे. मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून, वरुड तालुक्यात वाठोडा येथे आयोजित आमदार आपल्या दारी उपक्रमाचा हजारो ग्रामस्थांनी लाभ घेतला .मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार कायमच जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पाहायला मिळाले व आजही शहरी असो अथवा ग्रामीण प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार हे कायमच जनतेत पाहायला मिळतात.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार आपल्या दारी हे अभियान राबवण्यात येत असून या अभियाना अंतर्गत आमदार आमदार देवेंद्र भुयार स्वतः ग्रामीण भागात जाऊन तेथील जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत व त्या सर्व समस्या जागेवरच कशा सोडवता येतील त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देखील निर्गमित करत आहेत. या अभियानामुळे ग्रामीण भागातील हजारो नागरिकांच्या समस्या या काही मिनिटातच सुटत असल्याने ग्रामीम भागातील नागरिक देखील आता आनंद व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षात ज्या समस्या सुटल्या नाहीत त्या समस्या आता काही मिनिटातच सुटत असल्याने गावातील नागरिकांना दिलासा मिळत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील नागरिकांच्या महावितरण, ग्राम विकास व महसूल विभागाचे संबंधित असलेल्या सर्व अडचणी कशा सोडवता येतील यासाठी आमदार स्वतः सरसावले असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने ग्रामीण भागातील वृद्ध नागरिकांच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेच्या अडचणी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. या सर्व अडचणी आता काही क्षणातच मार्गी लागत आहेत आणि यामुळे निराधारांना दिलासा मिळत आहे . जनतेला केंद्रबिंदू म्हणून आमदार देवेंद्र भुयार यांनी हिची नवीन मोहीम हाती घेतली आहे त्या मोहिमेमुळे आता अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न तात्काळ मार्गी लागत आहेत. लवकरच मोर्शी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद गट आणि गण निहाय सर्व गावांना आमदार स्वतः भेटी देऊन त्यांचे प्रश्न गावात बसूनच मार्गी लावणार असून आता छोट्या छोट्या कामांसाठी वृद्ध नागरिकांना शहरात येण्याची आवश्यकता भासणार नाही. आणि हेच या मोहिमे मागची भावना असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.

श्रावणबाळ , संजय गांधी निराधार योजना , महसूल विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी, महिला व बालकल्याण विभाग, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, समाजकल्याण, सिंचन, लघु पाटबंधारे, महावितरण, पुरवठा, पशुसंवर्धन, आरोग्य, कामगार कल्याण, परिवहन विभाग, आदी विविध विभागांच्या दालनातून नागरिकांना योजनांची माहिती देण्यात आली व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी कृषि विभागांच्या योजने अंतर्गत MIDH अंतर्गत “संत्रा पुनर्जीवन ” या घटकासाठी अनुदान वाटप करण्यात आले आणि शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर वाटप करण्यात आले असून आमदार आपल्या दारी उपक्रमाच्या ठिकाणी नागरिकांना त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी लेखन कक्ष, अर्जवाटप कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. दिव्यांग नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती आदी शेकडो नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला.

यावेळी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, गट विकास अधिकारी वासुदेव कानाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळु पाटील कोहळे, राजाभाऊ कुकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, सुभाषराव शेळके, ग्राम चांदस येथील सरपंच कमलाबाई युवनाते, वाठोडा येथील सरपंच सुजाता गायकी, माजी पंचायत समिती सभापती निलेश मगर्दे, ऋषिकेश राऊत, हर्षल गलबले, प्रशांत भुजाडे, केतन खाडे, सागर सालोडे, बच्चु देशमुख, मोहनिश लिखितकर, अंकुश चोबितकर, पंकज धोटे, आश्विन देशमुख, नितीन बाडे, निलेश सालोडे, प्रशांत भुसारी, विजयराव धोटे, अशोक उपासे, चरणदास सालोडे, राजेंद्र वरुडकर, किशोर हेलोडे, किशोर चंबोळे, यांच्यासह शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.