महिलांनी शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे – एड‌ . पारोमिता गोस्वामी

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9मार्च):-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन कौशल्यम सभागृहात करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध समाजसेविका एड. पारोमिता गोस्वामी होत्या. प्राचार्य रवींद्र मेहेंदळे , गटनिदेशिका सौ. सुचिता झाडे, सौ. सुनिता गभणे, अविनाश गभणे, अमित शेंडे,कार्यक्रम अधिकारी एन.एन. गेडकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बी.आर .बोढेकर , सौ.भाग्यश्री गोर्लेवार, कु. माधुरी साखरकर, सौ. संगीता हेलवडे, श्रीमती विद्या कोंगरे, सौ. वैशाली वरठे, कु. अश्विनी माकोडे, कु. प्रणाली हेपट, कु. श्रध्दा वाघाडे, कु. आमटे, कु.नितू लोनगाडगे ,सौ. प्रज्ञा साव, कु. प्राची गभणे आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक एड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या की, स्वातंत्र्य आंदोलन असो की सामाजिक परिवर्तनाचे कार्य असो यात महिलांचे योगदान मोठे राहिले आहे. म्हणून आजच्या काळातील‌ आव्हाने लक्षात घेता प्रत्येक महिलेनी शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे,असे मत मांडले.प्राचार्य मेहेंदळे यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगून सर्व महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात.संस्थेच्या वतीने एड. पारोमिता गोस्वामी यांना शाल , श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.अतिथींचा परिचय बंडोपंत बोढेकर यांनी करून दिला.प्रस्तावना सौ. सुचिता झाडे यांनी केले. सूत्रसंचालन कु. अश्विनी माकोडे यांनी केले.