ग्राम विकास मंत्रालयाने घेतली दखल माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याची…

31

🔸शेवटी ग्रामसेवक गावात हजर

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223

नंदुरबार(दि.19जुलै):-माहीती अधिकार कार्यकर्ता विलास प्रतापराव शिंदे रा वसुर ता मुखेड जिल्हा नांदेड हे येथील रहिवासी असुन त्यांच्या गावामध्ये बरेच दिवसापासून ग्रामपंचायत ला ग्रामसेवक गैरहजर राहत होते. हे माहीती अधिकार कार्यकर्ता विलास प्रतापराव शिंदे यांच्या लक्षात आले. तेव्हा विलास शिंदे यांनी ग्रामसेवक नागेश्वर यांना फोन करून विचारना केली असता आपण सतत गैरहजर का रहाता . त्यावर ग्रामसेवक नागेश्वर यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगुन फोन कट करत असे मग विलास शिंदे यांनी गटविकास अधिकारी रोमोड साहेब पंचायत समिती मुखेड यांच्याशी संपर्क केला. व ग्रामसेवक वसूर ग्रामपंचायत ला हजर रहात नाहीत असे सांगीतले. त्यावर गटविकास अधिकारी यांनी मि ग्रामसेवक यांना सांगतो म्हणून फोन ठेवला. मग विलास शिंदे यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना फोन केला. त्यांनी पण असेच उत्तर दिले. मग विलास शिंदे यांनी विभागिय आयुक्त औरंगाबाद सुनिल केंद्रेकर साहेबांना फोन लावला. त्यांनी मि CO ना सांगतो म्हनाले.. मग विलास शिंदे हार न मानता थेट ग्रामविकास विभाग मंत्रालय उपसचिव गागरे साहेब यांना फोन केला व वरील सर्व माहिती त्यांना देली. गागरे साहेबांनी अतिशय तात्काळ दखल घेऊन नाव पत्ता व गटविकास अधिकारी यांचा नंबर घेतला. व गटविकास अधिकारी यांना ग्रामविकास विभाग मंत्रालय मधुन फोन आला. त्या नंतर ग्रामसेवक दुसऱ्या दिवशी वसुर ग्रामपंचायत ला हजार झाले.