मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर भादवी 302 दाखल करा – दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)

34

[बोंढार ता.जि.नांदेड अक्षय भालेराव खून प्रकरण]

(दादासाहेब शेळके व भीम टायगर सेना टिम ने बोंढार येथे घेतली पिडीताची भेट परिस्थितीचा घेतला आढावा)

✒️सिध्दार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)मो:-9823995466

नांदेड(दि. 6 जून):-पुढे बोलताना दादासाहेब शेळके म्हणाले संबंधित विभागाचे नेतृत्व करणारे लोक प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आरोपीच्या जातीचे असुन नातलग आहेत.

त्यानी अक्षय भालेरावचा खून होऊन 5 दिवस झाले तरी त्यांनी त्यांच्या मुखातून निषेध पर साधा शब्दही काढला नाही.

याचा अर्थ खून करण्यापूर्वी आरोपीनी अशोकराव चव्हाण व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलणे होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सदर प्रकरणात अशोकराव चव्हाण व प्रताप पाटील यांना आरोपी करून त्याच्यावर 302 गुन्हा दाखल करण्यात यावा व पुढे चौकशीत हे खरे की खोटे आहे हे तपासण्या साठी त्या दोघांचेही काॅल डिटेल्स तपासण्यात यावे.

अशी मागणी दादासाहेब शेळके यांनी भिम टायगर सेनेच्या वतीने पोलीस प्रशासना कडे केली.

हि मागणी केल्या बरोबर अशोकराव चव्हाण यांनी आपले तोंड फेसबुक वर उघडले व तपास लवकर पूर्ण करण्याची केली मागणी  यावेळी भिम टायगर सेनेच्या वतीने पीडित कुटुंबात शासकीय नोकरी व एक कोटीची आर्थिक मदत देण्यात यावी,

सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,पीडित कुटुंबीयास व साक्षीदार यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, आरोपीची प्रॉपर्टी सिल करण्यात यावी आधी मागण्या करण्यात आल्या यावेळी भीम टायगर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.