✒️आदेश उबाळे (श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.27जुलै):-बारामती तालुक्यातील तरुणीचा दिनांक २५ जूनला श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे राहणाऱ्या एका युवकाशी विवाह झाला होता. लग्नापूर्वीच या युवतीचे तरडोली गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे. दिनांक ११ जुलैला पतीच्या घरातून दीड लाख रुपये किंमतीचे दागिने घेऊन ती पळून गेल्याची घटना घडली आहे.पतीने दिलेल्या फिर्यादीत पत्नी प्रियकरासोबत आळंदीला पळाली असून तिथे जाऊन त्या दोघांनी लग्न केल्याचे म्हटलं आहे.

पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी आणि तिच्या प्रियकरा विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्न करुन आलेली बारामतीची नवरी दोन आठवड्यातच पळून गेली आणि परिसरात या घटनेने चर्चेला उधाण आले. घरातील १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन ती पसार झाल्याने, पत्नी आणि तिच्या प्रियकराने रचलेला कट यशस्वी झाला. मात्र, बिचारा नवरदेव हळद फिटते न फिटते तोच गृहस्त आश्रमाच्या पहिल्याच पायरीवर फसला हे दुर्दैव..
(स्रोत:श्रीगोंदा पोलीस व स्थानिक माहिती)

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED