पुसेगाव हिंदकेसरी बैलगाडी शर्यतीचे जय्यत तयारी पूर्ण

202

🔸प्रेक्षक बैठक व्यवस्था असणारे महाराष्ट्रातील एकमेव मैदान चेअरमन रणधीर जाधव , श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट

✒️सातारा-खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.6जानेवारी):*जिल्हा खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा ७६ वा वार्षिक रथोत्सव सोहळा बुधवार दि. १० जानेवारी रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील नामांकित हिंदकेसरी बैलगाड्यांच्या शर्यतीची जय्यत तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती या मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरीजी महाराज व देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव,विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख व गौरव जाधव यांनी दिली.

पुसेगाव यात्रा म्हणजे दहा दिवस कार्यक्रमाची रेलचे प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी प्रत्येक विभाग प्रत्येक क्षेत्रासाठी गावातील पंचमंडळी वैयक्तिक लक्ष देऊन सर्व नियमांचे पालन करत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत असतात .याचाच एक भाग म्हणून पुसेगाव येथील बैलगाडी शर्यत महाराष्ट्रातील नामांकित हिंदकेसरी बैलगाडी शर्यती म्हणून ओळखली जाते.

या बैलगाडी शर्यतीचे मैदान सुसज्ज बनवले असून बैलगाडी शौकिनांना शर्यत पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरी ची व्यवस्था करण्यात आलेली असून बैलगाड्या पळताना बैलांना प्रेक्षकांचा त्रास होऊ नये यासाठी ब्रॅकेट्स लावले आहेत प्रेक्षक व पळणाऱ्या जनावरांची देखील काळजी घेण्यात आलेली आहे. बैलगाडी मालक चालक यांनी नियोजित वेळेत आपल्या बैलगाड्यांच्या नोंदी करण्याचे आव्हान देखील देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेले आहे.

हिंदकेसरी बैलगाडी मैदानाची रोलिंग करणे यासाठी कृषी उत्पन्न समिती वडूज खटाव चे उपसभापती अण्णा वलेकर यांनी महाराजांच्या सेवेशी स्वखुशीने मदत केल्याचे चेअरमन रणधीर जाधव यांनी सांगितले