छात्रभारती संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी भुषण ढोले यांची निवड

166

🔸विज्ञान युगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना छात्रभारती पुसद तालुका कार्यकारणी गठीत

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.30जानेवारी):-छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या वतीने हुतात्मादिनानिमित्त एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर आणि छात्रभारती पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती कार्यक्रम दिनांक 30 जानेवारी रोजी गीताई सेवा केंद्र पुसद येथे आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रतिभा हागोने मॅडम उपस्थित होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. ज्ञानेन्द्र कुशवाह, यशवंत देशमुख सर शैलाताई सावंत आणि गजानन वायकुळे सर उपस्थित होते.तर प्रमुख उपस्थिती कॉ. निखिल टोपलेवार आणि सतीश चव्हाण उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन महात्मा गांधीच्या दृष्टिकोनातून उपेक्षित विद्यार्थी चळवळ या विषयावर तरुणांना मार्गदर्शन केले व त्यानंतर पुसद तालुका शाखा कार्यकारणी गठीत करण्यात आली.

यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून भूषण ढोले तर उपाध्यक्ष म्हणून अजय पांढरे, सचिव चेतन रंगारी ,संघटक यश मोटे, गायत्री वाहुळे ,भाग्यशाली गायकवाड, प्रसिद्धीप्रमुख ओम खडसे ,कार्यवाहक विश्वजीत हनवते, सदस्य सिद्धीका गादेकर, अश्विनी शेवाळे सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक छात्र भारती चे जिल्हा अध्यक्ष प्रशांत खंदारे यांनी केले. तर सल्लागार राजु गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार श्रेयश वाढवे यांनी मांनले.
—- —— —-
आज देशात शिक्षण आणि रोजगाराचा ज्वलंत प्रश्न तयार झाला आहे, सरकार शिक्षणाचे खासगीकरण करण्याचे पाऊल उचलत आहे. बेरोजगारीची आकडेवारी सरकार ने प्रसिद्ध करणे बंद केले आहे. राज्यात शेकडो मराठी शाळा बंद करण्याचे निर्णय राज्य सरकार घेत आहे.

अश्या वेळी शैक्षणिक प्रश्नांवर लढा निर्माण करणे ही काळाची गरज झालेली असताना छात्र भारती सारखी राजकीय संघटना मागील चाळीस वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढत आहे,त्या संघटनेची स्थापन आपल्या पुसद मध्ये झाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी छात्र भारती तत्परतेणे कार्य करेल, पुसद कार्यकारिणीला क्रांतिकारी शुभेच्छा .
– प्रशांत खंदारे
(जिल्हा अध्यक्ष छात्र भारती)