बहुजन समाज पार्टीच्या गंगाखेड विधानसभा अध्यक्ष पदी संतोष हणवते यांची निवड

105

✒️अनिल साळवे (गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18फेब्रुवारी):-फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जनसामान्य माणसापर्यंत पोहचवीसाठी आगामी लोकसभा आणि विधान निवडणूकीची तयारी करण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आकाश आनंदजी यांच्या आदेशान्वये बहुजन समाज पार्टी प्रदेशाध्यक्ष ॲड.परमेश्वर गोनारे यांच्या आदेशानुसार गंगाखेड विधानसभेच्या अध्यक्ष पदी *संतोष हणवते* याची निवड करण्यात आली.

गंगाखेड येथे आयोजित केलेल्या बैठकीत सदरील निवड करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी बहुजन समाज पार्टी चे परभणी लोकसभा अध्यक्ष मां. देवरावदादा खंदारे, बहुजन समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रशेंजित मस्के, प्रदेश कार्यकारणी सदस्य मां. शिवराज पैठने, जेष्ठ कार्यकर्ते धारबाजी गायकवाड, माधव मासे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीस कोद्री सर्कल प्रमुख सखाराम सावंत, सुरेश कांबळे,नरेंद्र भालेराव,मिलिंद साळवे,अशोक व्हावळे, राहुल मस्के, प्रमोद सरवदे, आदर्श तांबरे, वसंत कांबळे, समाधान कांबळे, अरविंद कांबळे, प्रकाश कांबळे, पत्रकार अविनाश जगतकर, पत्रकार राहुल साबणे.पत्रकार भीमराव कांबळे आदी कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते.