तीन डमी दहशतवादी बँक ऑफ इंडीया सिहोरा येथुन ताब्यात

481

🔺भंडारा जिल्हा पोलीस व बालाघाट जिल्हा पोलीस, मध्यप्रदेश प्रशासना तर्फे संयुक्त मॉक ड्रिल

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.23फेब्रुवारी):-भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास व ओलीस नागरीकांची सुटका कशी करावी, या बाबतचे प्रात्याक्षीक बैंक ऑफ इंडीया, शाखा सिहोरा, ता. तुमसर येथे भंडारा जिल्हा पोलीस व बालाघाट जिल्हा पोलीस, मध्यप्रदेश प्रशासना तर्फे संयुक्त मॉक ड्रिल मा. पोलीस अधीक्षक लोहित मतानी , भंडारा व श्री. अभिषेक चौधरी उपविभागीय पोलीस अधिकारी, वारासिवनी जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश यांचे मार्गदर्शनात घेण्यात आले.

दिनांक २३/०२/२०२४ चे दुपारी १५.३० वा. बँक ऑफ इंडीया, शाखा सिहोरा या ठिकाणी बनावट दहशतवादी यांचे कडुन बैंक लुटण्यासंबंधात रंगीत तालीम घेण्यात आली. त्यामध्ये बँकेमध्ये तीन डमी दहशतवादी आत प्रवेश करून लोकांना दहशित आनुन बैंक लुटण्याचा प्रयत्न करत आहेत.

याबाबत बँक ऑफ इंडीया सिहोरा परीसरातुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने १५.३० वा. चे दरम्यान पोलीस कढोल रूम येथे फोनद्वारे कळविण्यात आल्याने मा. श्री. राजेश थोरात, पोलीस उपअधिक्षक (गृह) सा. यांनी नियंत्रण कक्ष, भंडारा वरीष्ठांशी समन्वय साधुन सर्व पथके तात्काळ घटनास्थळी रवाना केले.

मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर कु. नितीपुडी रश्मीता राव I.P.S. यांचे नेतृत्वात पो.नि. श्री. निलेश व्यम्हणे (ठाणेदार तुमसर), स.पो.नि. श्री. निलेश गोसावी (ठाणेदार सिहोरा), स.पो.नि. श्री. विनोद गीरी (ठाणेदार गोबरवाही), स.पो.नि. श्री. तुरकुंडे (स्था.गु.शा), पो.नि. श्री. जितेंद्र बोरकर (जिल्हा विशेष शाखा), स.पो.नि. श्री. सुबोध वंजारी (दहशतवादी विरोधी शाखा), स.पो.नि. श्री. नितीन मदनकर (आर्थीक गुन्हे शाखा), पो.नि. श्री. सुभाष बारसे (वाहतुक शाखा), पो.हवा. श्री. मुनेश्वर मेश्राम (बी.डी.डी.एस.), पो.हवा. श्री. टिकाराम कोरे (डॉग युनिट), स.पो.नि. श्री. प्रशांत भावसार (फॉरेंसिक), पो.नि. श्री. सुनिल उईके (सुरक्षा विभाग), क्यु.आर.टी. व आर.सी. पी. पथक, पो.हवा. दिपक बुलबुले (फोटोग्राफर), श्री. जितेंद्र चवरे (कनिष्ट अभियंता अग्नीशामक), डॉ. मृणाली हेडाऊ (प्राथमीक आरोग्य केंद्र सिहोरा), तसेच भंडारा जिल्हा महाराष्ट्र सिमालगत असलेले मध्यप्रदेश, बालाघाट जिल्हा, पोलीस स्टेशन खैरलांजी येथील ठाणेदार पो.नि. संजय एक्का, पो.उप.नि. अंकीत उपाध्याय, पो.हवा. विरेंद्र सिंग/७४१, पो.शि. अंकीत राजपुत/११५४, पो.शि. ललीत देशमुख/६४२ हे तात्काळ घटनास्थळी हजर आले.

कु. नितीपुडी रश्मीता राव I.P.S. यांनी घटनास्थळाची सुत्रे हातात घेतले व बँक ऑफ इंडीया सिहोरा येथुन दहशतवादयांना ताब्यात घेणे व ओलीस असलेल्या नागरीकांची सुखरूप सुटका करण्याची कारवाईचे प्रात्याक्षिक पुर्ण करण्यात आले.

प्रात्याक्षिक वेळी बँक ऑफ इंडीया सिहोरा परीसरात नागरीका मध्ये भितीचे वातावरण निर्माण होवु नये या साठी योग्य ती खबरदारी घेवुन पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.