चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील आहेे-डॉ. सुरेशराव जाधव

    44

    ✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

    खटाव(दि.21नोव्हेंबर):-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बाहय परीक्षांना यशस्वीपणे सामोरे जाण्याकरता पुसेगाव ता खटाव जि सातारा येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने फाउंडेशन कोर्सेस लवकरच सुरु होणार आहेत . सदर कोर्सेस मधून उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाईल . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा बुद्धांक चांगला असून त्यास योग्य दिशा व मार्गदर्शन दिल्यास अनेक चांगले अधिकारी घडतील .

    जिगरबाज…!

    याकरता संस्था प्रयत्नशील आहे तसेच विद्यार्थ्यांनी प्रयत्न सोडू नयेत तसेच ध्येय पूर्ण होईपर्यत हार मानू नये ” असे विचार राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व संस्था सचिव डॉ श्री सुरेशराव जाधव यांनी श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पुसेगाव येथील पालक शिक्षक सभेत व्यक्त केले .

    न्यूज पोर्टलला शासनमान्यता!

    प्रमुख पाहुणे प्रा . गणेश कुमठेकर पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले ” विद्यार्थ्यांनी परीक्षांचा आनंद घ्यावा . क्रमीक पुस्तकांचा अभ्यास करावा . परदेशी भाषांचा अभ्यास करावा . पालकांनी आपल्या पाल्यास ध्येय पूर्तीकरता प्रेरणा द्यावी . वेळेचा सदुपयोग करावा . प्रयत्नात सातत्य ठेवावे .

    भारत तैवान मैत्री India-Taiwan Friendship पर्वास सुरवात!

    विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय जीवनापासूनच करावी . प्रा. जे. बी. जाधव यांनी प्रास्तावीक व स्वागतकेले . प्राचार्य श्री सुधाकर माने यांनी संस्थेच्या वतीने शाळेत सुरु असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली . कार्यक्रमास संस्था सचिव श्री मोहनराव जाधव , श्री . नवनाथ फडतरे , श्री . महेशराव नलवडे , पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वाती बर्गे यांनी सुत्रसंचालन मानले . पर्यवेक्षक श्री मोहनराव गुरव यांनी आभार मानले .

    ’भारत जोड़ो’ यात्रा : जाना किधर है? मंजिल कहाँ है??