साताळी येथील फिरस्ती कुत्र्याच्या तावडीतून एका हरणाच्या पिलाला सोडवून वनविभागाच्या कर्मचारी यांच्या स्वाधीन

34

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.6डिसेंबर):- साताळी महालखेडा रोड वर बबन सोनवणे यांच्या शेतात काही फ़िरस्ती कुत्रा नि एका हरणाच्या पिलाला चावण्याच्या प्रयत्न करत असताना जवळच असलेल्या कांदे लागण करणारे महिला व संदिप बबन सोनवणे यांनी त्या फ़िरस्ती कुत्रा ना दगडाने व काठीने पळवून लावले व हरणाच्या पिलाला जीवदान दिले पिलाच्या पायाला कुत्रानि चावा घेतल्या मुळे त्यातून रक्त येत होते.

नंतर त्यावर उपाय म्हणून हळद लावण्यात आली आणि तत्काळ वन विभागीय अधिकारी येवला येथील पवार साहेब यांना कळवण्यात आले व त्यांनी तातडीने वन विभागाची गाडी व अधिकारी साताळी येथे पाठवले व संदिप सोनवणे यांनी त्या हरणाच्या पिलाला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वाधीन करण्यात.

भारताचा अनमोल हिऱ्यास विनम्र अभिवादन !…

फौजदाराने सैनिकाला झोडपले!