1 रूग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने नेरी शहर तीन दिवस कडकडीत बंद

  43

  ?संपर्कातील 6 नागरिकांना पाठविले तपासणी करीता : दवाखाने व मेडिकल वगळता व्यवसाय, पेट्रोलपप, कृषी केंद्रे, शासकीय कार्यालये पूर्णतः बंद

  ?प्रशासनात खळबळ

  ✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चिमुुर(12जुुुलै):-चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढ होत असतांना चिमूर तालुक्यातिल नेरी येथे पहिला तर तालुक्यातील 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद शनिवार दि 11 जुलै सांयकाळी झाली.या अगोदर चिमूर तालुक्‍यातील सोनेगाव वन येथील ३५ वर्षीय नागरिक पहिला पॉजिटिव रुग्ण सहा दिवसांपूर्वी मिळाला आणि आता नेरी येथील 45 वर्षीय इसम दूसरा रुग्ण आढळून आल्याने चिमुर तालुक्याला कोरोनाचे ग्रहण लागले आहे. यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले असून नेरी येथील नागरिकांत मोठी खळबळ उडाली आहे.
  सदर इसम 45 वर्षीय वयाचा असून तो फुले वार्ड नेरी येथील असून तीन दिवसांपूर्वी हैदराबाद येथून आला होता नेरी येथील विलगिकरन कक्षात त्याला ठेवण्यात आले होते काल सायंकाळी त्यांच्या स्कब चे रिपोर्ट पॉजिटिव आल्यामुळे त्याला कोरोना रुग्ण घोषित करण्यात आले. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासन खळबळले असून, त्या व्यक्तीच्या संपर्कातील 6 व्यक्तींची स्लॅब टेस्ट करण्याकरिता पाठविण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
  सदर व्यक्ति हा लॉकडाउन लागन्यापूर्वी हैदराबाद येथे मूली कड़े भेटायला गेला होता मुलीला भेटून गावाकडे परत येणार तर संपूर्ण देश लॉकडाउन झाला होता त्यामुळे तो मुलीकडेच अडकला आणि तिथेच थांबला मागील तीन दिवसांपूर्वी तो नेरीत दाखल झाला असता त्याला नेरी येथील शाळेतिल अलगिकरण कक्षात ठेवण्यात आहे होते काल सायंकाळी त्याचा स्कब नमुना पॉजिटिव आल्यामुळे प्रशासनचे पुन्हा 6 व्यत्तींना खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी करीता पाठविण्यात आलेले आहे. त्यामुळे संपूर्ण नेरी शहर तीन दिवसासाठी बंद घोषित करण्यात आले आहे

  तर नेरी शहर तीन दिवस कडकडीत बंद:

  तालुक्यातील नेरी हि मोठी बाजारपेठ असून, 40 गावखेडे जवळपास असून, नेरी येथे नेहमी या खेड्यातील नागरिकांची दैनन्दिन व्यवहार साठी वर्दळ असते, नागरिक नेहमीच नेरीला आरोग्य, खरेदी, विक्री, बाजार साठी जानेयेणे करीत असून, नेरी येथील कोणत्याही व्यवसायिकाकडे येऊन संपर्क होऊ नये. त्याकरिता फक्त दवाखाने व मेडिकल वगळता सर्व शैक्षणिक, शासकीय कार्यालये व इतर सर्व व्यवसायांना तीन दिवस गावकऱयांच्या सहकर्याने कडकडीत बंद पाळण्यात येत आहे असे आव्हान ग्रामपंचायत ग्राम कोरोना बचाव समिति नेरी ने केले आहे

  कृषि केंद्रही बंद : शेतकरी चिंतेत
  पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी

  शेतीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेती करिता लागणारे खते व इतर औषधींची गरज आहे मात्र मागील 3 दिवसापासून त्यांचा संप सुरू असून पुन्हा त्यात 3 दिवसांची भर पडल्याने शेतकरी चिंतेत पडलेला आहे.
  त्याचप्रमाणे आधुनिक शेती ही ट्रॅक्टर द्वारे होत असल्याने त्याने डिझेल ची आवश्यकता असते मात्र सलग 3 दिवस पेट्रोल पंपही बंद असंल्याने पेट्रोल करीत व डिझेल भरण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली.