छत्रपती शिवराया बदल बेताल व्यक्तव्य करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाही करा..!

14

🔸उमरखेड मध्ये शिवसेनेकडून निषेध करून निदर्शने

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.21 नोव्हेंबर):-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबदल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गोपीचंद पडळकर, सुधांशू त्रिवेदी या तिघांनी महाराजाचा बेताल व्यक्तव्य करून अवमान करीत त्यांची तुलना केंद्रीयमंत्री ना. नितिन गडकरी यांच्या सोबत केली हा प्रकार करणाऱ्या वाचाळवीरा विरुद्ध महाराजा च्या झालेल्याअवमान प्रकरणीकठोर कार्यवाही करण्यासाठी शिवसैनिकांनी एकत्रित पणे येउन शहरातील संजय गांधी चौकात निदर्शने केली त्या नंतर या प्रकाराचे निवेदन उपविभागिय महसुल अधिकारी डॉ  राठोड व तहसिदार देऊळगांवकर यांना निवेदन देण्यात आले.

जिगरबाज…!

यावेळी अँड.बळीराम मुटकुळे, सतिष नाईक, प्रशांत पतेवार, गजेंद्र ठाकरे, डॉ अजय नरवाडे, संतोष जाधव, निलेश जैन, चितागराव कदम, गोपीचंद दोडके, राहूल सोनुने, राजेश कवाने, अमोल तिवरंगकर, बालाजी लोखंडे, संदीप शिलार, धनजय शेवाळकर, सुरेश कल्याणकर, तानाजी शिंन्दे, नितिन शिंन्दे, सतिष कुबडे, दुर्गेश उन्हाळे, कुष्णा जाधव यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थीत होते.

न्यूज पोर्टलला शासनमान्यता!