२४ वर्षीय तरुणाचा शेततळ्यात पाय घसरून दुर्दैवी मृत्यू

52

✒️येवला(पुरोगामी न्युज नेटवर्क)

येवला(दि.14डिसेंबर):- साताळी येथील मनोज सुभाष शिंदे हे शेजारी असलेल्या शेततळ्यावर डोंगळा चालू करण्या साठी गेले असता त्यांचा तोल जाऊन पाय घसरला मुळे तो तळ्यात पडला शेजारी उभा आसलेला त्याच्या भावाने व वडीलानी खूप प्रयत्न केला परंतु त्याला वाचवू शकले नाही.

अखेर मनोज काळाचा पाडद्या आड गेला त्याचा मृत देह काढण्या साठी स्थानिक पोहणारे यांनी पन खूप प्रयत्न केला पन मृतदेह सापडला नाही तब्बल ७ तासानी मनोजचा मृत देह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले व शव येवला येथील उपजिल्हा रुग्णाल येथे पाठवण्यात आले.

येवला तालुक्याचे तहसीलदार साहेब मा. हिले साहेब व ग्रामीण पोलिस निरीक्षक पाटील साहेब, प्रवीण भाऊ बनकर यांनी देखिल तत्काळ घटना स्थळी धाव घेतली.मनोजचा अशा दुर्दैवी घटनेने साताळी गाव, निमगाव व वनसगाव या तीनही गावात शोकाकु पासरला आहे.

चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी