संविधान चौक प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार व विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा हृदयस्पर्शी सत्कार!

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी) पुसद(दि.2ऑक्टोबर):-सविधान चौक प्रतिष्ठान तथागत नगर, पुसदच्या वतीने एका सामाजिक उपक्रमा अंतर्गत आपल्या समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार तथा संघटनेच्या विविध पदाधिकारी यांचा प्रतिष्ठानच्या वतीने हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला तसेच या ठिकाणी भोजनदान वाटपाचा कार्यक्रम ही घेण्यात आला. सविस्तर वृत्त असे की काही महिन्यापूर्वी

भारतीय बौध्द महासभेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी) पुसद(दि.19सप्टेंबर):- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पुसद यांच्या वतीने बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्याच्या कार्याबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा भारतीय बौद्ध महासभा करीत असते. अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या नीट या परीक्षेत उत्कृष्ट

विविध मागण्यासाठी वंचितचा जनआक्रोश मोर्चा पुसद उपविभागीय कार्यालयावर धडकला!

✒️सिद्धार्थ दिवकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466 पुसद(दि.15 सप्टेंबर):-वंचित बहुजन आघाडी पुसद तालुक्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष, बुद्धरत्न भालेराव, पुसद शहर अध्यक्ष दयानंद उबाळे, नेतृत्वव जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड,जिल्हा महासचिव उणकेश्वर मेश्राम, डि.के. दामोदर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात जनमोर्चाचाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये सेकडो, श्रमिक, वंचित, कामगार, तरुण युवक तथा महिला

पुसद येथील प्रज्ञापर्व समिती व समाज बांधवाच्या साखळी उपोषणास भारतीय बौध्द महासभेचा जाहीर पाठिंबा

✒️बाळासाहेब ढोले(पुसद,तालुका प्रतिनिधी) पुसद(दि.8सप्टेंबर):-धम्मनायक सम्राट अशोक महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे व सभोवतालच्या अतिक्रमण हटवून सौंदर्यीकरण करण्यासाठी साखळी उपोषण दि. ५ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आले आहे . सदर उपोषण सुरू करत असल्याचे निवेदन नगर परिषद

मांडवा येथे बंजारा समाजातील महिलांचा तीज महोत्सव

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी) पुसद(दि.12ऑगस्ट):-बंजारा समाजातील महिलांचा तीज महोत्सव आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक समाज घटक वेगवेगळे उत्सव आपल्या वेगळ्या ढंगाने आणि परंपरेने साजरा करतात.त्याचप्रमाणे बंजारा समाजात तीज उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कधीकाळी डोंगरदऱ्यात राहणाऱ्या बंजारा समाजात तीज म्हणजे आनंदाची पर्वणीच असते…सध्या श्रावण महिन्यात ठिकठिकाणच्या बंजारा तांड्यांवर तीज उत्सवाची धूम

मुहर्रम काय आहे?

देशबांधवांनो…आपल्या सर्वांना माझा सादर सलाम! भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे रोज सण आणि उत्सव साजरे होतांना दिसतात आणि त्या बद्दल सर्वांना आपुलकी असते त्याच प्रमाणे मोहर्र्म सुद्धा अश्याच प्रकारचा सण आपल्या इथे अनेक वर्षांपासून साजरा होत आहे तर या संदर्भात अनेक मुस्लिमेत्तर बांधव मुहर्रमसंदर्भात प्रश्न विचारतात. सोशल मिडीयावर

तीन ग्रामसेवक जिल्हा आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी) पुसद(दि.3ऑगस्ट):-पंचायत समितीतील विजय इसलकर व भारत गरड आणि कल्पना जतकर हे जिल्हा आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांना यवतमाळ येथील जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अमोल येडगे हे होते. प्रमुख पाहुणे

भिम टायगर सेनेच्या वतीने लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती पुसद पुसद बस स्थानकामध्ये उत्साहात साजरी

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी) पुसद(दि.2ऑगस्ट):-१ ऑगस्ट रोजी स्थानिक पुसद शहरातील बस स्थानकामध्ये लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती भिम टायगर सेनेच्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मारोती भस्मे पत्रकार तथा अध्यक्ष बिरसा मुंडा ब्रिगेड ,पत्रकार संजय रेक्कावार, पत्रकार मनोहर बोंबले, भिम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे

बोधिसत्व बुद्धविहारात बौद्धांचार्य,केंद्रीय शिक्षक,केंद्रीय शिक्षिका मेळावा उत्साहात संपन्न झाला

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी) पुसद(दि.25जुलै):-दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा यवतमाळ जिल्ह्याचे वतीने जिल्हास्तरीय बौध्दाचार्य केंद्रीय ,शिक्षक शिक्षिका मेळावा यवतमाळ येथील बोधिसत्व बुध्दविहारात दि.24 जुलै 2022 रविवार रोजी दुपारी ठिक 12 ते 5 या वेळेवर आयोजित करण्यात आला होता.सर्वप्रथम तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या

महावीर नगर येथील पारमिता बुद्धविहारात वर्षावासास प्रारंभ

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी) पुसद(दि.16जुलै):-शहरातील महावीरनगर येथील पारमिता बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा आणि पारमिता महिला मंडळ यांच्या वतीने वर्षावासाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आहे.आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांच्या कार्यकाळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म “या ग्रंथांचे वाचन करण्यात येत

©️ALL RIGHT RESERVED